शारदीय नवरात्र आणि आयुर्वेद: Shardiya Navratri and Ayurveda
अश्विन महिन्यात साजर्या होणार्या या नवरात्रात दुर्गेच्या ९ रुपांचं पूजन केलं जातं. या नवदुर्गांचा एक श्लोक आहे
During this Navratri celebrated in the month of Ashwin, 9 forms of Durga are worshipped. There is a verse of this Nava Durga -
प्रथमं शैलपुत्री च द्वितीयं ब्रह्मचारिणी।
तृतीयं चन्द्रघण्टेति कूष्माण्डेति चतुर्थकम् ।।
पंचमं स्कन्दमातेति षष्ठं कात्यायनीति च।
सप्तमं कालरात्रीति महागौरीति चाष्टमम् ।।
नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गा: प्रकीर्तिता: ।
उक्तान्येतानि नामानि ब्रह्मणैव महात्मना ।।
या ९ दुर्गा म्हणजेच दुर्गेची ९ रूपे ही ९ औषधी वनस्पतींमध्ये विराजमान झालेली आहेत. ज्याप्रमाणे ९ देवी आहेत, त्याप्रमाणेच या ९ वनस्पतींना वैद्यकीय उपचार पद्धतींच्या नवदुर्गा म्हटलं जातं. ९ दुर्गांची उपासना मनुष्याची आध्यात्मिक उन्नती करतात तर या औषधी वनस्पतींच्या रूपातील नवदुर्गा मनुष्याच्या शरीराचं समस्त व्याधींपासून रक्षण करतात.
These 9 Durga i.e. 9 forms of Durga are seated in 9 herbs. As there are 9 goddesses, these 9 plants are called the Navadurgas of medical treatment. Worship of 9 durgas gives spiritual upliftment of man while Navadurga in the form of these medicinal plants protects the human body from all diseases.
मार्कंडेय वैद्यकीय उपचार पद्धतीत सर्वप्रथम नवदुर्गांच्या या ९ औषधी स्वरुपांना स्थान दिलं गेलं. ब्रह्मदेवांनी हे ज्ञान "दुर्गाकवच" रुपात मार्कंडेय ऋषींना दिलं. सर्व प्रकारच्या रोगांवर रामबाण उपाय असणारी या औषधी वनस्पती मनुष्याचं रक्षण करतात म्हणजेच एक प्रकारे या वनस्पती मनुष्यासाठी 'कवच'च आहेत, त्यामुळे यांना दुर्गाकवच म्हटलं जातं.